अन्नपदार्थांमधील घटकांविषयी गोपनीयता बाळगून हिंदूंची फसवणूक केल्याचे प्रकरण : खाद्यपदार्थांमधील घटक हे गोमांस आणि डुकराचे मांस यांपासून बनवल्याचा संशय
- अमेरिकेतील हिंदू तेथील पदार्थांमधील घटकांविषयी जितके सतर्क आहेत, तितके भारतातील हिंदू नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !
- धार्मिक भावनांविषयी सतर्क असणार्या अमेरिकेतील हिंदूंकडून भारतातील जन्महिंदू काही बोध घेतील का ?
नेवाडा (अमेरिका) : खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यात येणार्या घटकांविषयी गोपनीयता बाळगून एकप्रकारे हिंदूंची फसवणूक करणार्या अमेरिकेतील ‘व्होल फूड्स मार्केट’ (डब्ल्युएफ्एम्) या सुपरमार्केट क्षेत्रातील आस्थापनाविषयी हिंदूंनी अप्रसन्नता व्यक्त केली आहे. ‘‘डब्ल्युएफ्एम्’कडून विकल्या जाणार्या काही खाद्यपदार्थांमध्ये ‘जिलेटीन’ नावाच्या द्रव्याचा वापर केला जातो. जिलेटीन हे द्रव्य अनेक प्राण्यांच्या मांसापासून बनवले जाते. यामध्ये गाय, डुक्कर आदी प्राण्यांचा समावेश आहे. ‘गाय ही हिंदूंसाठी आराध्य दैवत आहे. खाद्यपदार्थांवर जर जिलेटीनच्या स्रोताचा उल्लेख नसेल, तर हिंदूंची फसवणूक आहे, तसेच हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर करण्यासारखे आहे’, असे अमेरिकेतील हिंदु नेते श्री. राजन झेद यांनी म्हटले आहे.
‘‘डब्ल्युएफ्एम्’ने जिलेटीनचा समावेश असलेेले खाद्यपदार्थ मागे घ्यावेत आणि यापुढे जिलेटीनच्या स्रोताचा स्पष्ट उल्लेख असलेले खाद्यपदार्थ विक्रीस उपलब्ध करत हिंदूंची क्षमायाचना करावी’, अशी मागणी हिंदूंनी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात