प्रत्येक वेळी हिंदूंच्याच प्रथा-परंपरांवर बंदी आणून त्यांच्या श्रद्धा पायदळी का तुडवल्या जातात ? हिंदूंनी या विरोधात संघटित होऊन वैध मार्गाने आवाज उठवायला हवा !
सोलापूर : पंढरपूर शहरात ३ जुलै ते १७ जुलै २०१९ या कालावधीत होणार्या आषाढी यात्रेत मोठ्या प्रमाणात वारकरी जमणार आहेत. ‘यात्रेच्या कालावधीत वारकरी आणि भाविक यांच्याकडून नामदेव पायरी अन् परिसरात नारळ वाढवल्याने चिखल होण्याची शक्यता आहे. नारळ वाढवल्याने नारळाच्या करवंट्यांमुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये’, हे कारण पुढे करून पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ अन्वये मंदिर परिसरात नारळाची विक्री करणे आणि नामदेव पायरी येथे नारळ वाढवणे, यांवर बंदीचा आदेश दिला आहे.
‘हा आदेश ३ जुलै २०१९ या दिवशी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते १७ जुलै २०१९ या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यान्वित राहील’, असेही ढोले यांनी आदेशात सूचित केले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात