मंदिरांत इफ्तारच्या मेजवान्या देणार्या हिंदूंना चपराक !
- या घटनेविषयी सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार करणारे तथाकथित निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी काहीही बोलणार नाहीत; कारण त्यांच्या मते अन्य पंथियांनी श्रीमद्भगवद्गीता वाचणे सर्वधर्मसमभावाच्या विरोधातच आहे !
- धर्मांधांच्या दृष्टीने हिंदू काफीर आहेत आणि त्यांचे धर्मग्रंथ इस्लामविरोधी आहेत, हे या घटनेतून पुन्हा सिद्ध होत नाही का ?
अलीगड (उत्तरप्रदेश) : एका कारखान्यात सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे ५५ वर्षीय दिलशेर हे ४ जुलैला सकाळी त्यांच्या घरात श्रीमद्भगवद्गीता वाचत होते. त्या वेळी समीर, झाकीर आणि काही तरुण दिलशेर यांच्या घरात घुसले. त्यांनी दिलशेर यांना मारहाण केली आणि त्यांच्या घरातील गीता, रामायण आणि हिंदु धर्माशी संबंधित ग्रंथ घेऊन निघून गेले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
१. दिलशेर म्हणाले की, मी गेल्या ३८ वर्षांपासून धार्मिक पुस्तके वाचत आहे. मी मुसलमान आहे; पण माझा धर्म मला इतर धर्माचे पवित्र ग्रंथ वाचण्यापासून रोखत नाही. (दिलशेर यांना जो त्यांचा धर्म कळला आहे, तो अन्यांना कळलेला नाही कि तो कळूनही ते जाणीवपूर्वक अशा गोष्टी करत आहेत ? – संपादक)
२. या प्रकरणाचे अन्वेषण चालू असून लवकरच योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अलीगडचे पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात