Menu Close

प्रयागराज : बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी चर्चच्या बिशप बलदेव यांच्यावर गुन्हा नोंद

‘अशा घटना देशातील सर्वत्रच्या चर्चमध्ये होत नाहीत ना ?’, याची चौकशी सरकारने केली पाहिजे !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) : येथे बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी बिशप पीटर बलदेव आणि अन्य २ जण यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘डायोसिस ऑफ लखनौ चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’मधील हे प्रकरण आहे. येथे अनेक वर्षांपासून काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी पीटर बलदेव आणि अन्य काही जण यांच्यावर बलपूर्वक धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. ‘धर्मांतर न केल्यास नोकरीवरून काढून टाकण्यासह त्यांचे वेतन रोखले जाईल’, अशी धमकी कर्मचार्‍यांना देण्यात आली होती. पोलीस या गुन्ह्याचे अन्वेषण करत आहेत. (‘बाटगे अधिक कडवे असतात’, हेच यातून लक्षात येते ! पैशांच्या मोहासाठी स्वतः धर्मांतर करून नंतर अन्य हिंदूंचे धर्मांतर करणारे हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी होत ! सरकारने अशा पाद्य्रांना तात्काळ अटक करून कारागृहात डांबायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *