मंदिराच्या निमंत्रण पत्रिकेवर मुसलमानाचे नाव छापल्याचे प्रकरण
- अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी कधी असा आदेश देण्याचे धाडस दाखवले गेले असते का ?
- हिंदूंनो, कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांचा हा आदेश रहित करण्याची मागणी करा !
बेंगळुरू – दक्षिण कन्नड जिल्ह्यातील महालिंगेश्वर मंदिराच्या वार्षिक उत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवर दक्षिण कन्नड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ए.बी. इब्राहीम यांचे नाव निमंत्रक म्हणून छापल्याने हिंदु धर्मियांत संताप व्यक्त करण्यात आल्यावर हा विषय राज्याच्या विधानसभेत भाजपचे नेते सुनील कुमार यांच्याकडून मांडण्यात आला. त्यावर विधानसभेचे अध्यक्ष कागोडू थीम्माप्पा यांनी शासनास धारेवर धरले. कायदामंत्री टी.बी. जयचंद्र यांनी शिष्टाचार म्हणून जिल्हाधिकार्याचे नाव मंदिराच्या निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आले, अशी बनवाबनवी केली; मात्र यापुढे अशी चूक होणार नाही, असे आश्वासन दिले; मात्र कागोडू थीम्माप्पा यांनी हा कायदा योग्य नसून तो पालटण्याची आवश्यकता आहे. हिंदूंच्या मंदिरातील उत्सवाची देखरेख कुठलाही धर्मीय करू शकेल, असा पालट करण्याचे आदेश त्यांनी शासनाला दिला. त्यावर मंत्री जयचंद्र यांनी तशी सुधारणा करण्याचे मान्य केले.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात