हिंदु जनजागृती समितीची होळी-रंगपंचमी या सणांमधील अपप्रकारांच्या विरोधात चळवळ
भोर : होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीसाठी भोरचे नायब तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. होळी आणि रंगपंचमीच्या काळात काही अपप्रकार आढळल्यास आम्ही त्यावर कारवाई करू, असे आश्वासन डॉ. जाधव यांनी दिले.
या वेळी रायरेश्वर प्रतिष्ठानचे सर्वश्री चंद्रशेखर शेळके, योग वेदांत समितीचे अशोक बारीक, निगडे आणि भोर येथील धर्माभिमानी युवक नवनाथ सारुक, तुषार जाधव, स्वप्नील तांगडे, अमित सरक, सागर पवार, दिगंबर क्षीरसागर, स्वप्नील वेदपाठक, गोविंद वाल्हेकर, शुभम गोळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विठ्ठल जाधव, श्री. विश्वजीत चव्हाण उपस्थित होते. तहसीलदार मीनल कळसकर यांनाही समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या प्रसंगी सर्वश्री जयवंत साळुंके, मंगेश वाडकर, अनिकेत हरळे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात