धर्मशिक्षणाच्या अभावामुळे देवतांचे मानवीकरण करणारे हिंदू !
चेन्नई (तमिळनाडू) : सध्या ब्रिटनमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धा चालू आहे. ९ जुलैला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. तमिळनाडूतील स्वतःला गणेशभक्त समजणारे मूर्तीकार के.आर्. रामकृष्णन् यांनी या सामन्यासाठी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने रामकृष्णन् यांनी ‘क्रिकेट गणेश मंदिर’ उभारले आहे. यात फलंदाजी अथवा गोलंदाजी करतांनाच्या श्रीगणेशाच्या विविध मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. रामकृष्णन् यांनी क्रिकेटवर आधारित भजनेही रचली आहेत. ते प्रत्येक विश्वचषकाच्या वेळी भारताने विजय मिळावा म्हणून प्रार्थना करतात.
रामाकृष्णन् म्हणाले की, श्रीगणेशाच्या कृपेमुळेच सचिन तेंडुलकर, कपिल देव, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, आदी खेळाडूंना यश प्राप्त झाले आहे.
(ही छायाचित्रे प्रसिद्ध करण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात