हिंदु जनजागृती समितीच्या होळी आणि रंगपंचमी यांतील अपप्रकार रोखण्याची मोहीम !
मुंबई – रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी आणि महिला सुरक्षिततेसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भांडुप, नालासोपारा, दादर, वरळी, शिवाजी पार्क, माहीम, चुनाभट्टी, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द आणि नवी मुंबई या ठिकाणी निवेदन देण्यात आले.
या वेळी श्री योग वेदांत सेवा समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू गोवंश रक्षा समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदि संघटनाचे कार्यकर्ते उपस्थित होते. माहीम येथे धर्माभिमानी श्री. धनंजय ठाकूर त्याचप्रमाणे चुनाभट्टी येथे पंचशीलनगर मित्र मंडळाचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. मानखुर्द पोलीस ठाण्यात निवेदन देतांना श्री. राहुल पवार, श्री. तुषार जाधव, श्री. विनोद जगताप आणि श्री. राजेश केरेकर उपस्थित होते. चेंबूर आणि गोवंडी पोलीस ठाण्यांत निवेदन देतांना श्री. कैलास वाघमोडे, श्री. शेखर मिरेकर, श्री रविंद्र दाभाडे, श्री. देवेंद्र परब, श्री. संदीप मांडवकार आणि श्री. विजय सरगर उपस्थित होते.
भांडुप (पूर्व) पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक श्री. राव यांनी निवेदन स्वीकारून आम्हीही असे अपप्रकार थांबवण्याचे प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन केले.