देशात गोहत्या आणि गोमांस यांद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात असतांना अशा प्रकारचे आव्हान देणार्यांच्या विरोधात पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी का बोलत नाहीत ? अशांतून जमावाचा उद्रेक होऊन एखादी अयोग्य घटना घडली, तर त्याला उत्तरदायी कोण रहाणार ?
चामराजनगर (कर्नाटक) – येथे मुसलमानांची संघटना असणार्या ‘सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया’कडून नुकताच मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यामध्ये रा.स्व. संघाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तसेच ‘आम्ही गोमांस भक्षण करतो. तुमच्यात शक्ती असेल, तर आम्हाला रोखून दाखवा’, अशा घोषणा देण्यात आल्या. या घोेषणाबाजीच्या विरोधात संघाकडून तक्रार करण्यात आल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करून ३ धर्मांधांना अटक केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments