धर्मरक्षणार्थ वैध मार्गाने लढा देणार्या हिंदूंचे अभिनंदन !
थिरुवनंतपूरम् (केरळ) : येथील कारागृह प्रशासनाकडून शहरातील काही भागांमध्ये अन्नपदार्थ आणि पाणी यांची विक्री करण्यात येते. गेल्या ५ वर्षांपासून कारागृह प्रशासनाचे एक वाहन श्री पद्मनाभस्वामी मंदिरासमोर उभे करून मांसाहारी अन्नपदार्थांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. (मंदिराच्या परिसरात मांसाहारी पदार्थ विकायचे नसतात, हे कारागृह प्रशासनाला ठाऊक नाही का कि जाणूनबुजून संबंधितांकडून ही कृती केली जात होती ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या पवित्र स्थळी मांसाहारी अन्नपदार्थ विकले जात असल्याने भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात होत्या. नुकतेच काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सदस्य आणि श्री पद्मनाभस्वामींचे भक्त यांनी या घटनेचा वैध मार्गाने निषेध केला अन् मांसाहारी अन्नपदार्थांची विक्री बंद पाडली. या प्रकरणी धर्माभिमानी हिंदूंनी कारागृह प्रशासनाकडे याविषयी तक्रार केली. कारागृह प्रशासनाकडून मंदिरासमोर होणारी मांसाहारी अन्नपदार्थांची विक्री कायमस्वरूपी बंद करण्याचे आश्वासन कारागृह अधीक्षकांनी दिले आहे. (केवळ आश्वासन देणे पुरेसे नसून आतापर्यंत ती कृती करणार्या संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात