- हिंदूंपुढील वाढता धोका पहाता शासनाने ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे !
- केवळ अविवाहित नाही, तर विवाहित महिलांनाही धर्मांध जाळ्यात ओढून वासनेची शिकार बनवत आहेत. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु महिलाही सामाजिक संकेतस्थळावरील धर्मांधांच्या भूलथापांना बळी पडत आहेत !
हातकणंगले (जिल्हा कोल्हापूर) : फेसबूकच्या माध्यमातून विवाहाचे खोटे आमीष दाखवून वारंवार बलात्कार केल्याच्या प्रकरणी हातकणंगले येथील चौघांना शिरोली पोलिसांनी अटक केली आहे. शाहरूख साजिद पटेल, साजिद मैनुद्दीन पटेल, मनसुख पटेल आणि दिलशाद साजिद पटेल, अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. ही घटना टोप येथे घडली. या प्रकाराचे सखोल अन्वेषण करून हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार आहे का ? या दृष्टीने यंत्रणेने अन्वेषण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
१. म्हाळुंगे (तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे) येथील ३२ वर्षीय महिलेची फेसबूकच्या माध्यमातून शाहरूख पटेल याच्याशी ओळख झाली. प्रारंभी मैत्रीच्या माध्यमातून ते एकमेकांना संदेश पाठवत. शाहरूखने ‘तू मला खूप आवडतेस, त्यामुळे आपण दोघे विवाह करूया’, असे सांगितल्यावर महिलेने ‘माझा विवाह झाला आहे, तसेच मला एक मुलगी आहे’, असे सांगून विवाहास नकार दिला.
२. यानंतरही शाहरूखने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला पुष्कळ आवडतेस. मला तुझ्याशीच विवाह करायचा आहे. मी तुझ्याविना जगूच शकत नाही. त्यामुळे तू नवर्याशी घटस्फोट घेऊन माझ्याकडे ये’, असा हट्ट धरला.
३. याच कालावधीत पीडित महिलेचे नवर्यासमवेत भांडण झाले. हे समजताच शाहरूख पुणे येथे जाऊन विवाहाचे खोटे आमीष दाखवून टोप येथे महिलेला घरी घेऊन आला आणि तिच्यावर बळजोरी केली. अशीच बळजोरी कोल्हापूर शहरातही अनेक वेळा केली.
४. यानंतर पीडितेने विवाहासाठी शाहरूखकडे विचारणा केल्यावर शाहरूख, साजिद, मनसुख आणि दिलशाद पटेल यांनी विवाहितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली.
५. या प्रकरणाची नोंद शिरोली औद्योगिक पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक अन्वेषण साहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन भोसले हे करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात