भोर (जिल्हा पुणे) – येथील निगडे या गावामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग घेण्यात येतो. या धर्मशिक्षणवर्गातील सर्व धर्मप्रेमी आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून २३ मार्च या दिवशी सामूहिक होळी उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी श्री महालक्ष्मी मंदिर ते ग्रामदैवत श्री महाकाली मंदिरापर्यंत होळीनिमित्त प्रबोधन फेरीचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे प्रा. श्रीकांत बोराटे यांनी उपस्थितांना होळीचे महत्त्व, शास्त्र आणि होळी उत्सवामध्ये होणारे अपप्रकार यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी ८० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी आयोजित केला होता.
क्षणचित्रे
१. होळीच्या संदर्भातील धर्मशिक्षण देणारे फलक घेऊन धर्मप्रेमी फेरीत सहभागी झाले होते.
२. अनेक ग्रामस्थ होळीच्या ठिकाणी भूमीवर नैवेद्य ठेवत होते. त्या वेळी धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी त्यांचे प्रबोधन केले. (धर्मरक्षणासाठी तत्पर असणार्या धर्मप्रेमींचे अभिनंदन ! – संपादक)