ममता बॅनर्जी यांच्या राज्यात महिला असुरक्षित ! बंगालमध्ये धर्मांधांकडून होणार्या गुन्हेगारी कृत्यांवर तृणमूल काँग्रेस सरकारकडून नेहमीच पांघरूण घातले जात आहे. याविषयी निधर्मीवादी का बोलत नाहीत ?
कोलकाता – बंगालमधील अभिनेत्री स्वस्तिका दत्ता यांना ‘उबर’ या खासगी टॅक्सी वाहतूक आस्थापनाच्या जमशेद या धर्मांध चालकाने अवमानकारक वागणूक दिल्याची घटना समोर आली आहे.
१. अभिनेत्री दत्ता यांनी त्यांच्या फेसबूक खात्यावर याविषयी माहिती देतांना सांगितले की, जमशेद मला चित्रीकरणाच्या ठिकाणी नेण्यासाठी माझ्या निवासस्थानी आला. तेथून आम्ही टॅक्सीतून निघालो; मात्र काही अंतर प्रवास केल्यावर त्याने मधेच ‘भाडे रहित केले’, असे सांगत मला खाली उतरवले. मी त्याला नकार दिल्यावर त्याने टॅक्सी त्याच्या भागात नेली आणि मला शिवीगाळ केली. तसेच मला गाडीतून बाहेर ढकलून दिले. मी साहाय्यासाठी ओरडू लागले, तर त्याने त्याच्या साथीदारांना बोलावले आणि मला धमकी दिली. मला चित्रीकरणाला विलंब होत असल्याने मी तेथून निघून गेले.
२. या घटनेची माहिती मिळाल्यावर कोलकाता पोलिसांनी ट्वीट करून कारवाई करत असल्याची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी कोलकातामध्येच माजी ‘मिस इंडिया’ असणार्या तरुणीची धर्मांधांकडून छेड काढण्यात आली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात