Menu Close

प्रमोद मुतालिक यांच्यावरील आरोप कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला

  • ‘प्रत्येक हिंदूने घरात तलवार ठेवली पाहिजे’, असे विधान केल्याचे प्रकरण

  • श्री. मुतालिक यांच्या विरोधातील प्रकरणही रहित

काँग्रेसच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठांवर असे खोटे गुन्हे नोंदवून त्यांना गुन्हेगार ठरवण्यात येत होते, हे यातून स्पष्ट होते !

बेंगळूरू (कर्नाटक) : तडगणी (जिल्हा शिवमोग्गा) या गावात २५ मे २०१७ या दिवशी झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी भावना भडकावणारे कथित भाषण केल्याचा पोलिसांचा आरोप कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायाधीश पी.एन्. दिनेश यांच्या एक सदस्यीय पिठाने श्री. मुतालिक यांच्या विरोधातील प्रकरण आणि त्या संदर्भातील चौकशीही रहित केली आहे.

१. श्री. मुतालिक यांचे अधिवक्ता श्री. अरुण श्याम यांनी युक्तीवाद करतांना सांगितले, ‘‘श्री. मुतालिक सहभागी असलेल्या कार्यक्रमात कोणतीही अहितकारी आणि प्रक्षोभक घटना घडली नाही. कोणीही तक्रार प्रविष्ट केली नाही. कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस शिपायाने प्रविष्ट केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी स्वतःहून तक्रार नोंदवून घेतली. (अशी तक्रार पोलिसांनी कधी हिंदूंना संपवण्याची भाषा करणार्‍या ओवैसी यांच्याविरुद्ध केली आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ही तक्रार प्रविष्ट करून घेण्याची अनुमती देतांना सरकारने सारासार विचार केला नाही. तक्रारीचे अन्वेषण करणार्‍या अधिकार्‍याने पुरावे गोळा करून सरकारला सादर केले पाहिजेे; परंतु सरकारने एकतर्फी अनुमती दिली; म्हणून प्रकरण रहित करण्यात यावे.’’

२. तडगणी गावातील समारंभात भाषण करतांना श्री. प्रमोद मुतालिक म्हणाले होते, ‘‘प्रत्येक हिंदूने घरात तलवार ठेवली पाहिजे. हिंदूंनी मुसलमानांशी कोणतेही आर्थिक व्यवहार करू नयेत. शिराळकोप्पा ‘छोटे पाकिस्तान’ झाले आहे.’’ या विधानांमुळे जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *