गोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढल्याचा निषेध करण्याचे सूत्रही धर्मांधांनी अनुमती पत्रात दिले !
नालासोपारा : येथे धर्मांधांनी स्थानिक गोष्टींसाठी आंदोलन करण्याची अनुमती पोलिसांकडे मागितली होती; मात्र यासाठीच्या पत्रात विनाकारण गोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढल्याचा निषेध करणे, तसेच तबरेज यांचे झालेले ‘मॉब लिंचिंग’ ही सूत्रे घातली. यामुळे दोन समाजांत तणाव निर्माण होऊन वसई आणि नालासोपारा येथील परिस्थिती चिघळू शकते, हे लक्षात घेऊन हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात निषेध व्यक्त करून आंदोलन रहित करण्याची मागणी केली. अखेरीस पोलिसांनी १२ जुलै या दिवशी होणार्या धर्मांधांच्या आंदोलनाला अनुमती रहित केली.
१. ‘सनसिटी येथील सर्वधर्मीय दफनभूमीला विविध राजकीय पक्ष आणि संघटना विरोध करत आहेत. विद्युत् मंडळाकडून येथील मशीद परिसरातील वीजपुरवठा बंद केला जात आहे’, या निषेधार्थ आंदोलन करणार असल्याचे पत्र धर्मांधांनी स्थानिक पोलीस ठाण्यात दिले.
२. या पत्रात धर्मांधांनी ‘नालासोपारा येथील वैभव राऊत यांनी संघटनेसाठी मागवलेला दारूगोळा पोलिसांनी जप्त केला असतांनासुद्धा त्यांना वाचवण्यासाठी संघटनेकडून मोर्चा काढला, त्याचा आम्ही निषेध करतो’, असे सूत्र संबंध नसतांना घातले. (गोरक्षक वैभव राऊत यांच्या निर्दोषत्वाविषयी निश्चिती असल्यानेच सहस्रो स्थानिक हिंदू हे राऊत यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले, याचा धर्मांधांना पोटशूळ का उठावा ? याचा अर्थ या सर्वच स्थानिक हिंदूंचा या धर्मांधांना आंदोलनाद्वारे निषेध करायचा होता का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
३. तसेच ‘तबरेजसारख्या घटना वसईतही होत आहेत’, असे नमूद करून समीर मर्चंट नामक व्यक्तीला वसई रेल्वेस्थानकावर मुसलमान असल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा आरोप धर्मांधांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात केला.
४. श्री. वैभव राऊत यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांनाही या पत्रात त्यांचे सूत्र घालण्यात आले. येथील स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी सामाजिक माध्यमांवर ही ‘पोस्ट’ पाहिल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन याविषयी विचारणा केली असता पोलिसांनी यावर उडवाउडवीची उत्तरे दिली.
५. नंतर असंख्य हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना संपर्क करून ‘यामुळे वातावरण चिघळू शकते, दोन समाजांत तेढ निर्माण होऊ शकतो’, असे कळवल्यानंतर पोलिसांनी यातील सनसिटी दफनभूमी’ आणि ‘विद्युत् मंडळ’ या दोनच सूत्रांना अनुमती दिली असल्याचे सांगितले; मात्र धर्मांधांनी सर्वच सूत्रांचा समावेश असल्याच्या बातम्या ‘व्हॉट्स-अॅप’वरून सर्वत्र प्रसारित केल्या. (अशी खोटी माहिती पसरवणार्या धर्मांधांवर पोलीस काय कारवाई करणार आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
६. यामुळे स्थानिक नागरिकांत घबराट पसरली. शिवसेनेचे श्री. जितेंद्र हजारे, भाजपचे श्री. नीलेश खोखाणी आणि धर्माभिमानी श्री. राजेश पाल यांनी पोलीस ठाण्यात ‘धर्मांधांचे आंदोलन रहित करावे’, अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली. या निवेदनात ‘सूरत आणि आझाद मैदान येथे अशी आंदोलने होऊनच दंगली झाल्या, असे वातावरण नालासोपार्यात होऊ देऊ नका’, असेही नमूद केले.
७. सर्वश्री सोहम नेगी, महेंद्र शर्मा, स्वप्नील शहा आणि अप्पू गुप्ता आदी हिंदुत्वनिष्ठांनी संपर्क करून विरोध दर्शवला.
८. ५० हून अधिक हिंदूंनी भ्रमणभाष करून पोलिसांकडे काळजी व्यक्त केली. रात्री १२ वाजेपर्यंत हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात फेर्या मारल्या. शेवटी हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांमुळे पोलिसांनी धर्मांधांच्या आंदोलनाला दिलेली अनुमती रहित केली. या वेळी पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांनाच चेतावणी देण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात