Menu Close

गोमांसाचे सूप पितांनाचे छायाचित्र ‘फेसबूक’द्वारे प्रसारित करणार्‍या धर्मांधाला जमावाकडून मारहाण

  • हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचाच हा प्रयत्न होता. त्यामुळेच जमावाचा उद्रेक झाला, हे लक्षात घेतले पाहिजे !
  • धार्मिक पुस्तकाची पाने फाडल्याची किंवा ती जाळल्याची केवळ अफवा पसरली, तरी धर्मांधांकडून देशभरात दंगली घडवल्या जातात, तरीही त्यांना कोणी असहिष्णु म्हणत नाही !

चेन्नई : तमिळनाडूतील पोरावेचेरी या गावामध्ये महंमद फैसन या धर्मांध तरुणाने गोमांसाचे सूप पितांनाचे छायाचित्र ‘फेसबूक’द्वारे प्रसारित केल्यानंतर त्याला जमावाकडून मारहाण करण्यात आली. यात तो घायाळ झाला आहे. हे छायाचित्र प्रसारित करतांना त्याने या पदार्थाच्या चवीचेही वर्णन केले होते.

या प्रकरणी पोलिसांनी दिनेश कुमार, अगाथियन्, गणेश कुमार आणि मोहन कुमार या चौघांना अटक केली आहे. या घटनेचे वृत्त ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीने दिले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *