Menu Close

कोल्हापूर येथे क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

kolhapur_nivedan
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. सावंत (उजवीकडे) यांना निवेदन देतांना क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनचे कार्यकर्ते

कोल्हापूर : एम्.आय्.एम्. या पक्षाचे खासदार असदुद्दीन औवेसी आणि आमदार वारिस पठाण यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशा मागणीचे निवेदन क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनचे श्री. प्रसादसिंह मोहिते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. सावंत यांना दिले.

या वेळी सर्वश्री जगन्नाथ बावडेकर, स्वप्नील कोळी, विपुल घाटगे, शाहूराज काटे भोसले, दया पाटील, सदाशिव पाटील, अनिकेत पोवार, अजिंक्य पाटील, सचिन भोसले, अवधूत चौगुले, पराग मोहिते, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे, शिवसेनेचे सर्वश्री पद्माकर कापसे, किशोर घाटगे यांसह अन्य उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही असदुद्दिन यांचे भाऊ अकबरुद्दीन औवेसी यांनी १५ मिनिटात हिंदूंना संपवण्याची भाषा केली होती. इतके सगळे असूनही त्यांच्यावर आजतागायत काहीच कारवाई झालेली नाही. यामुळे अशा प्रकारे देशद्रोही आणि धर्मभेदी खासदार असदुद्दिन औवेसी यांच्यावर पोटा, मोका अथवा नवीन कायद्याची निर्मिती करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *