स्वामी ज्योतिर्मयानंद, तसेच अन्य ८ यात्रेकरू यांना मारहाण
- रेल्वे पोलीस धर्मांधांचे ऐकतात कि वरिष्ठ अधिकार्यांचे ? या घटनेची सरकारने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
- अशी घटना हज यात्रेकरूंच्या संदर्भात हिंदूंकडून घडली असती, तर एव्हाना ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरून एकजात निधर्मी आणि पुरोगामी हे हिंदूंवर तुटून पडले असते !
हरिद्वार : रेल्वेगाडीतून प्रवास करणार्या काही अमरनाथ यात्रेकरूंची धर्मांध महिलांनी कुरापत काढली. नंतर या धर्मांध महिलांनी रेल्वे पोलीस दलाला चिथावणी देऊन या यात्रेकरूंना अमानुष मारहाण करण्यास भाग पाडल्याची घटना नुकतीच घडली. मारहाण करण्यात आलेल्यांमध्ये स्वामी ज्योतिर्मयानंद, तसेच अन्य ८ यात्रेकरू यांचा समावेश आहे.
(पोलीस कधील मुल्ला-मौलवी अथवा पाद्री यांना अशा प्रकारे मारहरण करतील का ? हिंदूंच्या साधू-संतांना मारहाण करणारे पोलीस धर्मांधांसमोर नांगी टाकतात, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
१. १० जुलै या दिवशी भारत सेवाश्रम संघाच्या बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात असलेल्या कालियागंज येथील शाखेचे प्रमुख स्वामी ज्योतिर्मयानंद आणि अन्य ८ भाविक अमरनाथ यात्रा संपवून जम्मू-तावी येथून सेलडा येथे जाणार्या ‘हमसफर एक्सप्रेस’ गाडीतून प्रवास करत होते. तेव्हा मेहनाज रहमान आणि ई. रहमान, तसेच त्यांच्या समवेत असलेल्या २ धर्मांध महिला यांनी या यात्रेकरूंना त्यांच्या जागांवर बसू देण्याची विनंती केली. वास्तविक हे यात्रेकरू त्यांच्या आरक्षित जागीच बसले होते.
२. दुपारी काही वृद्ध यात्रेकरूंना आराम करायचा असल्याने त्यांनी या धर्मांध महिलांना त्यांच्या आरक्षित जागांवर जाऊन बसण्याची विनंती केली. त्यावरून या धर्मांध महिला संतप्त झाल्या. त्यांपैकी एकीने तिचे पती रेल्वेत वरिष्ठ अधिकारी असून ‘गाडी लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे पोचल्यावर सर्व यात्रेकरूंना धडा शिकवू’, अशी धमकी दिली. त्यावर या यात्रेकरूंनी अधिक वाद न घालता त्या महिलांना जागा करून दिली.
३. गाडी लक्ष्मणपुरी येथे पोचल्यावर या धर्मांध महिला खाली उतरल्या. त्यांनी रेल्वे पोलीस दलाला या यात्रेकरूंविरुद्ध चिथावणी दिली. त्यामुळे पोलिसांनी ११ जुलैच्या रात्री डब्यात शिरून कोणतीही विचारपूस न करता स्वामी ज्योतिर्मयानंद आणि त्यांच्या समवेत असलेल्या भाविकांवर अमानुष लाठीमार केला. यात ३ महिलांसह सर्व यात्रेकरूंना दुखापत झाली. त्यानंतर पोलीस गाडीतून उतरले.
४. हे सर्वजण सेलडा येथे पोचल्यावर त्यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कालियागंज येथे पोचल्यावर स्वामी ज्योतिर्मयानंद यांनी रेल्वेमंत्री पियुुष गोयल आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्विटरवरून या घटनेची माहिती दिली.
५. केंद्रीय संंरक्षणमंत्री राजनाथसिंह हे लक्ष्मणपुरीचे खासदार आहेत. विशेष म्हणजे भारत सेवाश्रम संघाचे संस्थापक आचार्य स्वामी प्राणवानंद महाराज यांना योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपिठाचे माजी पदाधिकारी आणि नाथ संप्रदायाचे माजी प्रमुख बाबा गंभीरनाथ यांनी दीक्षा दिली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात