समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि साईभक्त यांना निवेदन !
सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांवरून श्री साईबाबा यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करणारा, तसेच त्यांनी केलेल्या चमत्कारांना खोटे ठरवणारा एक संदेश प्रसारित (पोस्ट) होत आहे. या संदेशात श्री साईबाबा यांच्यावर टीका करतांना कथित अध्यायांचा संदर्भही देण्यात आला आहे. हा संदेश हिंदु जनजागृती समितीच्या नावाने प्रसारित होत आहे. तथापि या संदेशाशी हिंदु जनजागृती समितीचा कोणताही संबंध नाही. समितीने असा कुठलाही संदेश प्रसारित केलेला नाही, याची समस्त हिंदुत्वनिष्ठ आणि साईभक्त यांनी नोंद घ्यावी.
हिंदु जनजागृती समितीच्या नावे खोटा संदेश प्रसारित करून समितीची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी समिती अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे.
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.