७ पोलीस घायाळ
- पोलिसांवर होणार्या आक्रमणांच्या वेळी आक्रमणकर्त्यांवर गोळीबार करण्याचा आदेश पोलिसांना का दिला जात नाही ? कि ‘पोलिसांनी धर्मांधांकडून नेहमीच मार खावा’, असा नियम आहे का ? अशी स्थिती असेल, तर जनतेचे रक्षण कोण करणार ?
- गोतस्करांना किरकोळ मारहाण झाल्यावर ओरड करणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, लेखक, अभिनेते आदी या घटनेच्या विरोधात का बोलत नाहीत ?
प्रयागराज (उत्तरप्रदेश) : येथील धूमनगंज भागातील मरियाडीह या मुसलमानबहुल गावामध्ये १३ जुलैला गोहत्येच्या प्रकरणातील आरोपी नुरैन याला पकडण्यासाठी ८ पोलीस गेले होते. त्यांनी आरोपीला कह्यातही घेतले; मात्र त्या वेळी शेकडो धर्मांधांनी त्यांच्यावर दगडफेक चालू केली, तसेच गोळीबार करत आरोपीला पोलिसांच्या कह्यातून सोडवून नेले. त्यानंतर हा आरोपी त्याच्या साथीदारांसह तेथून पळून गेला. या आक्रमणामध्ये ७ पोलीस घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात पोलीसबळ मागवण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी नुरैन, हसनैन, सकलैन, फरहान, इमरान, आझाद, अश्फाक, तौफीक, नदीम, फैजान, अकरम, इशरत, फैजान, महताब, आरिफ, अबू तलहा, शाकिब, ताहिर, इरफान, गुफरान अहमद अशा एकूण ४० महिला आणि पुरुष यांच्यावर गुन्हे नोंदवले आहेत. या घटनेनंतर गावातील बहुतेकांनी घरांना टाळे लावून पलायन केले आहे. या सर्वांचा पोलीस शोध घेत आहेत.
Ashutosh Mishra, SP Crime, Prayagraj: Seven police personnel were injured in attack by villagers when they went to arrest a man wanted in a case of cow smuggling. Strict action will be taken and those involved in the attack will be arrested soon. (13.07.19) pic.twitter.com/JO9CXeiky2
— ANI UP (@ANINewsUP) July 14, 2019
मरियाडीह गाव सर्वाधिक गुन्हेगारी असणारे गाव आहे. हे गाव कुख्यात गुंड आणि माजी खासदार अतीक अहमद याचा अड्डा समजला जातो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात