Menu Close

तमिळनाडूमध्ये ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या तळांवर एन्आयएच्या धाडी

देशात आतंकवादी आक्रमण करण्याचा कट

भारतात ‘इस्लामी राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी कार्यरत असणार्‍या जिहादी आतंकवादी संघटनांविषयी देशातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मी तोंड का उघडत नाहीत ?

चेन्नई : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) तमिळनाडूची राजधानी चेन्नई आणि नागपट्टिणम् येथे ‘अंसारूल्ला’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ३ ठिकाणांवर धाड टाकली. या धाडीतून मिळालेल्या माहितीनुसार ‘अंसारूल्ला’कडून देशात आतंकवादी आक्रमण करण्याचा कट रचण्यात आल्याचे उघड झाले. ही संघटना भारतात इस्लामी राष्ट्राची स्थापना करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. येथून कह्यात घेण्यात आलेल्या काही जिहादी आतंकवाद्यांची चौकशी चालू आहे. (‘जय श्रीराम’ न म्हणणार्‍यांना कथितरित्या मारहाण केल्यावरून आकाशपाताळ एक करणारे पुरोगामी अटक करण्यात आलेल्या जिहादी आतंकवाद्यांविषयी का बोलत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संघटनेचे जिहादी आतंकवादी देशात सर्वत्र कार्यरत आहेत. त्यांचे विदेशातील जिहादी आतंकवाद्यांशी संबंध आहेत.

२. एन्आयएने दिलेल्या माहितीनुसार जिहादी सय्यद महंमद बुखारी, हसन अली आणि महंमद युसुफुद्दीन, तसेच त्यांचे अन्य साथीदार यांनी मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले आहेत. ते भारतात आतंकवादी आक्रमण करण्याची सिद्धता करत होते. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

३. चेन्नई येथील सय्यद बुखारी याचे घर आणि कार्यालय यांवर धाड घालण्यात आली. तसेच नागपट्टिणम् जिल्ह्यामध्ये हसन अली आणि महंमद युसुफुद्दीन यांच्या घरांवर धाड टाकण्यात आली. या धाडीतून ९ भ्रमणभाष संच, १५ सीम कार्ड, ७ मेमरी काडर्र्, ३ लॅपटॉप, ५ हार्ड डिस्क, ६ पेन ड्राइव्ह, २ टॅब्लेट, ३ सीडी अन् डिव्हीडी (ध्वनीचित्र-चकत्या) जप्त करण्यात आल्या. तसेच काही फलक, पत्रके आणि पुस्तकेही जप्त करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *