इस्लामविषयी कथित आक्षेपार्ह लिखाण प्रसारित करणार्या हिंदु तरुणीला सशर्त जामीन
‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला केल्यास हिंदूंना संपवू’, असे म्हणणारे एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांना जामीन देतांना हिंदूंच्या धर्माविषयीची एखादी गोष्ट करण्याची अट का घालण्यात आली नाही?’, असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित झाल्यास नवल ते काय ?
रांची (झारखंड) : सामाजिक माध्यमांतून इस्लामविषयी कथित आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय ऋचा भारती या तरुणीला दंडाधिकारी न्यायालयाने सशर्त जामीन संमत केला. न्यायालयाने जामीन देतांना ऋचा भारती यांना १५ दिवसांत कुराणाच्या ५ प्रती वाटण्याचा आदेश दिला आहे. जर या आदेशाचे पालन केले नाही, तर जामीन रहित करण्यात येणार आहे. अंजुमन कमेटी आणि रांचीच्या सरकारी विश्वविद्यालयाच्या महाविद्यालयांत किंवा शाळांत या प्रती वाटण्यास सांगण्यात आले आहे. तसेच प्रती वाटतांना ऋचा भारती यांना सुरक्षा देण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे.
I am just appalled. SHOCKING. Hindu woman was ordered to distribute Quran as a condition for her bail. Imagine if a Muslim was ordered to distribute Gita as a condition for bail media would have cried by now. #RichaBharti #IstandwithRichaBharti #Hindus #RanchiCourt pic.twitter.com/29WXQbBGHX
— TJ (@IamTarunJoshii) July 16, 2019
१. १२ जुलैला अंजुमन कमेटीने केलेल्या तक्रारीनंतर ऋचा भारती यांना अटक करण्यात आली होती. या तक्रारीत म्हटले होते की, गेल्या ३ दिवसांपासून ऋचा भारती या इस्लामविषयी आक्षेपार्ह लिखाण करत आहे. यामुळे येथे केव्हाही धार्मिक भावना भडकू शकते.
२. पोलिसांनी या तक्रारीनंतर ऋचा यांना लगेच अटक केली. (धर्मांधांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि हिंदूंनी त्या विरोधात तक्रार केल्यावर पोलीस इतकी तत्परता दाखवतात का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध केला. त्यांनी येथे बंदही पाळला आणि निदर्शनेही केली.
आज कुराण वाटण्यास सांगितले, उद्या इस्लाम स्वीकारण्यास सांगतील ! – ऋचा भारती
Richa Bharti stands by her belief and refuses to distribute Quran as a condition for her bail by Supreme Court
When chanting Jai Shri Ram and Vande Mataram is always under secular Radar, Why distributing #Quran is forced to a Hindu? #RichaBharti #IStandWithRichaBharti pic.twitter.com/4R31a3L94m— Geetika Swami (@SwamiGeetika) July 16, 2019
जामिनावर सुटका झाल्यावर ऋचा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हटले, ‘‘मी कुराणाच्या प्रती वाटू इच्छित नाही. आज कुराण वाटण्यास सांगितले, उद्या इस्लाम स्वीकारण्यास सांगतील.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात