धर्मांध जाणीवपूर्वक त्यांना वैयक्तिक किंवा अन्य कोणत्याही कारणाने झालेल्या मारहाणीला धार्मिक रंग देऊन हिंदूंना अपकीर्त करून पुरो(अधो) गामी, निधर्मीवादी यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, हेच स्पष्ट होते !
बागपत (उत्तरप्रदेश) : १४ जुलैच्या रात्री दुचाकीवरून घरी जात असतांना १२ पेक्षा अधिक लोकांनी थांबवून ‘जय श्रीराम’ म्हणण्यास सांगितले; मात्र नकार दिल्यावर त्यांनी मारहाण केली, असा आरोप येथील जोला गावामधील मौलवी इमलाउर रहमान यांनी केला होता. या घटनेची पोलिसांनी चौकशी केल्यावर मौलवी यांनी त्यांना ‘जय श्रीराम’ म्हणण्यास सांगिल्याचा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात