Menu Close

उत्तर प्रदेश : धर्मांधांकडून गोतस्करांना पकडायला गेलेल्या पोलीस पथकावर आक्रमण


करकरहटा गावामध्ये एका घरात मोठ्या प्रमाणात गोहत्या केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे धाड घातली. या वेळी धर्मांधांनी पोलीस पथकावरच आक्रमण केले. एका पोलीस अधिकार्‍यावर धारदार हत्याराने वार करण्यात आला; परंतु त्यांनी ‘बुलेटप्रूफ जॅकेट’ घातल्याने तो वाचला. पोलिसांनी १४ जिहाद्यांना अटक केली, तर बरेच जण पसार झाले. या धाडीत पोलिसांनी ५२ सहस्र रुपये, गायीची ६ वासरे, गोमांस, चाकू, पिस्तुले, स्फोटके, बंदुका इत्यादी जप्त केले.

गाडीवर शिवसेनेचे स्टिकर चिकटवून शस्त्रास्त्रांची वाहतूक

काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशाच्या बिजनोर येथील एका मदरशामध्ये शस्त्रांचा साठा सापडला होता. तेथे होणार्‍या शस्त्रांच्या तस्करीविषयी संशय येऊ नये, यासाठी ही शस्त्रे वाहून नेणार्‍या गाडीवर शिवसेनेचे स्टिकर चिकटवण्यात येत होते. (धर्मांधांची हुशारी आणि त्याला फसणारे पोलीस ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *