हंपी (कर्नाटक) : वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हंपीजवळच्या अनेगुंडी येथील संत व्यासराजा तीर्थ यांची समाधी काही अज्ञातांनी उद्ध्वस्त केल्याची घटना नुकतीच येथे घडली. व्यासराजा तीर्थ हे विजयनगर साम्राज्याचे सम्राट कृष्णदेवराय यांचे आध्यात्मिक गुरु होते. माधवाचार्य संत परंपरेतील ते १२ वे यती होते. तुंगभद्रा नदीच्या काठावरील नव वृंदावन गड्डेे वास्तूमधील ९ समाध्यांपैकी ती एक होती. ‘समाधीस्थळी लपवलेला खजिना लुटण्याच्या उद्देशाने ती उद्ध्वस्त केली असावी’, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ‘या घटनेच्या अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. श्वानपथकाच्या माध्यमातूनही अन्वेषण चालू आहे. गुन्हेगारांना लवकरच पकडण्यात येईल’, असे पोलीस अधीक्षक रेणुका सुकुमार यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात