Menu Close

देवतांविषयी आक्षेपार्ह लिखाण प्रसारित करणार्‍या लेखिका अशी कलिम यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

मुंबई : हिंदूंच्या देवतांविषयी ट्वीटद्वारे आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या लेखिका अशी कलिम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे अशी कलिम यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

धार्मिक भावना दुखावल्याविषयी अशी कलिम यांच्या विरोधात न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात आला आहे. जुलै २०१९ मध्ये अशी कलिम यांनी स्वत:च्या ट्विटरवरून हिंदूंचे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्णाचा बलात्कारी, तर श्री दुर्गादेवीचा वेश्या असा उल्लेख केला होता. सीतामातेविषयीही आक्षेपार्ह ट्वीट केले होते. तसेच १ टक्के मुस्लिमांनी या देशावर राज्य केले, आज आम्ही (मुस्लीम) २० टक्के आहोत, असे हिंदूंना चेतावणी देणारे वक्तव्य त्यांनी केले होते. राधा, शिव, ब्रह्मदेव आदी हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयीही अशी कलिम यांनी अश्‍लील विधाने केली आहेत. या विरोधात अधिवक्त्या चांदनी शाह यांनी १९ जुलै या दिवशी गोरेगाव येथील बांगूरनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

या प्रकरणी अशी कलिम यांच्या अधिवक्त्यांनी कलिम यांच्या ट्वीटसमवेत छेडछाड करण्यात आली आहे, असे न्यायालयात सांगितले. तसेच एक स्त्री म्हणून तिचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी न्यायालयाकडे विनंती केली होती. यावर अशी कलिम यांच्या विरोधात न्यायालयात बाजू मांडतांना अधिवक्त्या चांदनी शाह यांनी अशा संवेदनशील प्रकरणात अशी कलिम यांचा स्त्री म्हणून नव्हे, तर केवळ एक व्यक्ती म्हणून विचार केला जावा, असा युक्तीवाद न्यायालयापुढे केला. न्यायालयाने अधिवक्त्या चांदनी शाह यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून निर्णय दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


लेखिका अशी कलिम यांच्या विरोधात समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पोलीस ठाण्यात तक्रार

जुलै २५, २०१९

लेखिका अशी कलिम यांनी ‘ट्विटर’वर हिंदूंच्या देवतांचे विडंबन करून धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करा !

पोलीस निरीक्षक श्री. वसंत बाबर (उजवीकडे) यांच्याकडे तक्रारीची प्रत देतांना रेखा दुधाणे आणि हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर : लेखिका आणि कवयित्री अशी कलिम यांनी ७ जुलैला ट्विटर या सामाजिक प्रसारमाध्यमावर श्रीकृष्ण, श्रीराम, सीता, ब्रह्मदेव, सरस्वती या हिंदूंच्या देवतांविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्‍लाघ्य भाषेत टिपणी करून त्यांचा घोर अवमान केला. या विडंबनात्मक लिखाणामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी कलिम यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी १५३ आणि २९५ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार हिंदु महासभेच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष रेखा दुधाणे यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. वसंत बाबर यांच्याकडे दिली. या वेळी रेखा दुधाणे यांच्या समवेत समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षकांनी ‘वरिष्ठांशी चर्चा करून आणि अधिक माहिती घेऊन पुढील कार्यवाही करू’, असे सांगितले. (हिंदु देवतांवर अश्‍लाघ्य भाषेत ट्विटरवर टिप्पणी करणार्‍या अशी कलिम यांच्या विरोधात तक्रार देणार्‍या हिंदु महासभेच्या रेखा दुधाणे यांचे अभिनंदन ! प्रत्येक हिंदूने रेखा दुधाणे यांचा आदर्श ठेवला पाहिजे आणि वैध मार्गाने निषेध नोंदवला पाहिजे ! – संपादक)

या वेळी हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप, शहराध्यक्ष श्री. जयवंत निर्मळ, शहर उपाध्यक्ष श्री. संतोष पवार, श्री. शरद माळी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुवर्णा पवार, शहराध्यक्ष मनीषा पवार, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे श्री. शरद माळी, शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव आणि श्री. किशोर घाटगे, विश्‍व हिंदु परिषदेचे शहराध्यक्ष श्री. अशोक रामचंदानी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते.

रेखा दुधाणे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,

१. मी धर्माने हिंदु असून माझी हिंदु धर्मावर, हिंदु धर्मातील सर्व देवता, संत यांच्यावर श्रद्धा आहे.

२. ट्विटरवर ट्वीट करून लेखिका अशी कलिम म्हणतात, ‘१६ सहस्र १ महिलांवर श्रीकृष्णाने बलात्कार केला होता, तसेच तो राधेसमवेत ‘रिलेशनशिप’मध्ये होता. सीतेचे स्वयंवर झाल्यानंतर तिचे अपहरण केले होते. त्यानंतर सीतेने अग्नीपरीक्षा दिल्यानंतर ती पळून गेली होती. सरस्वती आणि ब्रह्मदेव हे दोघे ‘रिलेशनशिप’मध्ये होते. शंकर आपल्याच मुलाचे धड का वेगळे करील ? वडील ब्रह्माने स्वतःची मुलगी सरस्वतीवर बलात्कार केला होता. लव आणि कुश यांचे वडील रावण आहे. सीता अरण्यात असतांना तिचा पती वाल्मीकि होता. त्यामुळे ज्या देवतांना त्यांच्या पत्नींची माहिती नाही, त्यांची पूजा करणे थांबवा. अशा देवतांच्या बलात्काराच्या अनेक गोष्टी, कथा आहेत.’

३. ही व्यक्ती (अशी कलिम) हिंदुद्वेषी असून जाणीवपूर्वक हिंदु धर्मियांच्या भावना दुखावण्यासाठी तिने अशा प्रकारचे ट्वीट केल्याचे दिसून आले. या माध्यमातून धार्मिक सलोखा बिघडून सामाजिक शांतता धोक्यात आली आहे, तसेच दोन धर्मांत वितुष्ट निर्माण होत आहे. तरी संबंधित व्यक्तीवर भारतीय दंडविधानातील योग्य त्या कलमान्वये तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी.


धर्मांध लेखिका अशी कलिम यांच्याकडून ‘ट्विटर’वर हिंदूंच्या देवतांचे विडंबन

जुलै २०, २०१९

  • कुणा हिंदु लेखिकेने मुसलमानांच्या श्रद्धास्थानांविषयी असे लिहिले असते, तर एव्हाना देशात दंगली झाल्या असत्या आणि प्रसिद्धीमाध्यमांनीही आकांडतांडव केले असते. आता मात्र प्रसिद्धीमाध्यमे हे वृत्त का देत नाहीत ?
  • हिंदु सहिष्णु असल्यानेच त्यांच्या श्रद्धास्थानांचे इतके खालच्या स्तरावर जाऊन केलेले विडंबन सहन करतात. ‘हिंदूंच्या देवतांचा कितीही घोर अवमान केला, तरी हिंदू काहीही करणार नाहीत’, हे धर्मांधांना ठाऊक आहे, त्यामुळे त्यांच्याकडून हिंदूंच्या देवतांची अशी घोर विटंबना केली जाते !

मुंबई : धर्मांध लेखिका आणि कवी अशी कलिम यांनी ७ जुलैला ‘ट्विटर’ या सामाजिक संकेतस्थळावर श्रीकृष्ण, श्रीराम, सीता, ब्रह्मदेव, सरस्वती या हिंदूंच्या देवतांविषयी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अश्‍लाघ्य भाषेत टिपणी करून त्यांचा घोर अवमान केला. या विडंबनात्मक लिखाणामुळे समस्त हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे  पोलिसांनी ‘कलिम यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी २९५ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करावी’, अशी मागणी हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केली आहे. कलिम यांच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. (कलिम यांनी जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी हे अश्‍लाघ्य कृत्य केले आहे. त्यामुळे पोलिसांनी नुसती बघ्याची भूमिका न घेता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, हीच हिंदूंची मागणी आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

लेखिका अशी कलिम ‘ट्विटर’वर म्हणतात, ‘‘१६ सहस्र १ महिलांवर श्रीकृष्णाने बलात्कार केला होता, तसेच तो राधासमवेत ‘रिलेशनशिप’मध्ये (संबंधात) होता. सीतेचे स्वयंवर झाल्यानंतर तिचे अपहरण केले होते. त्यानंतर सीतेने अग्नीपरीक्षा दिल्यानंतर ती पळून गेली होती. सरस्वती आणि ब्रह्मदेव हे दोघे ‘रिलेशनशिप’मध्ये होते. शंकर आपल्याच मुलाचे धड का वेगळे करील ? वडील ब्रह्माने स्वतःची मुलगी सरस्वतीवर बलात्कार केला होता. लव आणि कुश यांचा वडील रावण आहे. सीता अरण्यात असतांना तिचा पती वाल्मीकि होता. त्यामुळे ज्या देवतांना त्यांच्या पत्नींची माहिती नाही, त्यांची पूजा करणे थांबवा. अशा देवतांच्या बलात्काराच्या अनेक गोष्टी, कथा आहेत.’’ (सहिष्णु हिंदूंना जाणीवपूर्वक लक्ष्य करणार्‍या कलिम यांच्या विरोधात संघटित होऊन हिंदूंनी वैध मार्गाने आवाज उठवायला हवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *