कुंभारी (जिल्हा सोलापूर) येथे नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या बलीदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम
कुंभारी (जिल्हा सोलापूर) : नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचा त्याग आणि बलीदान लक्षात ठेवून हिंदुत्वाचे कार्य करूया. संघटन हे सर्व आघातांवर उपाय आहे. हिंदूंनी संघटन वाढवून हिंदु धर्माला जाणून घ्यावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सचिन जोशी यांनी केले. ते नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या बलीदान दिनानिमित्त १७ जुलै या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी बजरंग दलाचे जिल्हा सरसंयोजक श्री. विश्वनाथ जवळगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. धीरज छापेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांसह ४० धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी उपस्थित होते.
बजरंग दलाचे जिल्हा सरसंयोजक विश्वनाथ जवळगे म्हणाले, ‘‘केवळ हिंदु धर्मच जगात शांतता आणू शकतो.’ या कार्यक्रमाचे आयोजन कुंभारी येथील धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे केले होते. कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थितांनी ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेतली. या वेळी उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे ‘हर हर महादेव’, ‘भारतमातेचा विजय असो’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ या घोषणा दिल्या. हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे यांनी सूत्रसंचालन केले.
क्षणचित्र : या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.
नरवीर बाजीप्रभूंचा स्वराज्याविषयीचा त्याग स्मरणात ठेवून ईश्वरी राज्याकडे वाटचाल करूया ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती
नरवीर बाजीप्रभूंनी स्वराज्यावर निष्ठा आणि श्रद्धा ठेवून पराक्रम केला, तसा सुराज्यासाठी आताच्या युवकांनी विचार आणि शरीर यांच्या मर्यादा न ठेवता बाजीप्रभूंचा स्वराज्याविषयीचा त्याग स्मरणात ठेवून ईश्वरी राज्याकडे वाटचाल करूया.