कागल (जिल्हा कोल्हापूर) : इंग्रजांनी १८५७ च्या समरानंतर ‘आर्म्स अॅक्ट’ आणून हिंदूंना नि:शस्त्र केले, तर गांधीजींनी स्वातंत्र्यसंग्रामात हिंदूंना अहिंसेचा मार्ग शिकवल्याने हिंदू क्षात्रतेज विसरले. हिंदूंच्या मनातून क्षात्रतेज नाहीसे झाल्याने आज ठिकठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत असतांनाही हिंदू प्रतिकार करत नाहीत. बाजीप्रभु यांच्या बलीदानाच्या निमित्ताने त्यांनी ज्याप्रकारे शौर्य गाजवले, तोच आदर्श समोर ठेवून हिंदूंनी वीरश्री जागृत ठेवली पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. ते बाजीप्रभु देशपांडे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने १७ जुलै या दिवशी धर्मप्रेमी श्री. प्रमोद आरेकर यांच्या घरी (काळम्मावाडी वसाहत) आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
प्रारंभी शिवसेना कागल शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी आणि श्री. किरण दुसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी श्री. किरण कुलकर्णी म्हणाले, ‘‘बाजीप्रभु देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य यांच्यासाठी प्रसंगी प्रार्णापण केले. तोच आदर्श समोर ठेवून आपणही राष्ट्र आणि धर्म यांसाठी कृतीप्रवण होणे आवश्यक आहे.’’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. संतोष सणगर यांनी केले.
क्षणचित्र – कार्यक्रमानंतर समितीच्या वतीने स्वरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. असे प्रशिक्षणवर्ग नियमितपणे चालू करण्याची मागणी या वेळी धर्मप्रेमींनी केली.