Menu Close

बांगलादेश सरकार हिंदु महिलेविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवणार !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बांगलादेशी हिंदु महिलेने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांची माहिती दिल्याचे फलित !

  • बांगलादेशाच्या महिला पंतप्रधान शेख हसीना यांचे भारताशी चांगले संबंध आहेत, तरीही त्यांच्या देशात एका हिंदु महिलेवर हिंदूंवरील अत्याचारांची वस्तूस्थिती मांडल्यावर कारवाई होत असेल, तर भारताने किमान यात तरी हस्तक्षेप करून तिचे रक्षण केले पाहिजे !
  • बांगलादेशातील अल्पसंख्यांकांची विशेषतः हिंदूंची स्थिती कशी आहे ?, हे जगाला ठाऊक आहे. तीच ट्रम्प यांच्यासमोर मांडल्यावर जर बांगलादेशी महिलेवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद होणार असेल, तर भारताने या महिलेला भारतात राजाश्रय दिला पाहिजे ! यापूर्वी हिंदूंवरील अत्याचार ‘लज्जा’ या कादंबरीद्वारे जगासमोर मांडणार्‍या लेखिका तस्लिमा नसरिन यांना भारताने आश्रय दिला होता !

ढाका (बांगलादेश) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन त्यांना बांगलादेशातील हिंंदूंवरील अत्याचारांची माहिती देणार्‍या बांगलादेशातील ‘बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती एकता परिषदे’च्या संघटनमंत्री प्रिया साहा यांच्यावर आता देशद्रोहाचा खटला चालवण्यात येणार आहे. साहा यांनी १७ जुलैला ट्रम्प यांची वॉशिंग्टन येथे भेट घेतली होती. त्यांनी ट्रम्प यांना सांगितलेल्या माहितीचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमातून प्रसारित झाल्यावर बांगलादेशाच्या मंत्र्यांनी साहा यांच्यावर खटला चालवण्यात येणार असल्याचे सांगितले.

१. अमेरिका सरकारच्या धार्मिक स्वातंत्र्य नीतीच्या अंतर्गत आयोजित कार्यक्रमात साहा यांनी ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. साहा म्हणाल्या की, ‘बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांकांमधील ३ कोटी ७० लाख लोक गायब झाले आहेत. त्यांना अवैधरित्या कारागृहात टाकण्यात आले आहे किंवा त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा संशय आहे.’

२. प्रिया साहा यांच्या या विधानावर बांगलादेशचे परिवहनमंत्री आणि सत्ताधारी अवामी पक्षाचे सरचिटणीस ओबैदुल कादर म्हणाले की, ‘या महिलेने खोटे, कुटील हेतूने आणि कपटी विधान केले आहे. यामुळे बांगलादेशाची प्रतिमा मलीन झाली आहे. यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात येईल. कायद्याच्या अंतर्गत जितके करता येईल तितके तिच्या विरोधात केले जाईल. बांगलादेशातील कोणताही हिंदु, बौद्ध किंवा ख्रिस्ती प्रिया साहा यांच्या या विधानाशी सहमत होणार नाही.’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *