हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करणे, हीच काळानुसार खरी गुरुदक्षिणा आहे ! – ब्रह्मर्षि पुराण वाचस्पती महेश्वर शर्मा
करीनगर (तेलंगण) : आज संपूर्ण हिंदु समाज पाश्चात्त्य विकृतीचा गुलाम झाला आहे. व्यक्तीच्या जीवनात पहिला गुरु तिची आई असते; परंतु आईनेच स्वत: धर्माचे आचरण सोडले आहे. अलीकडे सण-उत्सव सोडले, तर वयाने मोठ्या असलेल्या हिंदु महिलांनाही आपल्या संस्कृतीनुसार पेहराव करायला आवडत नाही. त्यामुळे हेच संस्कार त्यांच्या मुलांवरही होतांना दिसत आहेत. हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूच्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे आणि हीच काळानुसार खरी गुरुदक्षिणा आहे, असे प्रतिपादन ब्रह्मर्षि पुराण वाचस्पती महेश्वर शर्मा यांनी केले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने करीनगर येथील वैश्य भवनात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे तेलंगण समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमामध्ये ‘कौटुंबिक धार्मिक कृतींमागील शास्त्र’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
२. गुरुपौर्णिमेला अन्य जिल्ह्यांतूनही धर्मप्रेमी युवक उपस्थित हेते.
३. एका जिज्ञासूने सांगितले की, शहराच्या मध्यवर्ती भागात आमचे मंगल कार्यालय आहे. ते तुमच्या कार्यक्रमासाठी कधीही वापरू शकता.
४. धर्मप्रेमी कार्यक्रमाच्या सिद्धतेत उत्साहाने सहभागी झाले.