Menu Close

एर्नाकुलम् (केरळ) येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

मार्गदर्शन करतांना त्रिदंडी स्वामी श्री चैतन्यदास भारती महाराज

एर्नाकुलम् (केरळ) : एर्नाकुलम् येथील ‘आंध्रा कल्चरल असोसिएशन’च्या सभागृहात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कोट्टयम् येथील श्री. आणि सौ. तंगच्चन यांनी गुरुपूजन केले. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन कु. प्रणिता सुखटणकर यांनी केले. ‘गुरुपरंपरा आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ या विषयावर मलप्पुरम् येथील हिंदु एकता मंचचे उपाध्यक्ष त्रिदंडी स्वामी श्री चैतन्यदास भारती महाराज यांनी मार्गदर्शन केले. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचे योगदान’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या कु. रश्मी परमेश्‍वरन् यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता आठवीत शिकणारा आणि अभ्यासासमवेत सेवा करणारा कु. आकाश सिजू याचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कु. अदिती सुखटणकर यांनी केले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *