राऊरकेला (ओडिशा) : सनातन संस्थेच्या वतीने सुंदरगड जिल्ह्यातील वेदव्यास येथील व्यास रेसिडेन्सी कमिटीच्या सभागृहामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अधिवक्ता विभूति भूषण पलेई यांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात आणि हिंदूसंघटनाची आवश्यकता’ या विषयावर, तर हिंदु जनजागृती समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना आणि हिंदूंचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन केले. येथील व्यावसायिक आणि सनातनचे साधक श्री. आकाश राजगढीया आणि सौ. नीशा राजगढीया यांनी गुरुपूजन केले.
क्षणचित्रे
१. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत हिंदु जनजागृती समितीचे हिंदूसंघटनाचे अद्वितीय कार्य !’, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अलौकिक कार्य !’ आणि ‘हिंदु विधीज्ञ परिषद’ या विषयांवरील लघुपट दाखवण्यात आले.
२. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे ५० वर्षांहून अधिक काळ निष्ठेने कार्य करणारे ‘भारतीय संस्कती सुरक्षा समिती’चे संस्थापक सचिव श्री. नीलकंठ मोहंती यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
३. अधिवक्ता पलेई, अधिवक्ता श्री. करमचंद करण, माजी संपादक श्री. ज्ञानरंजन मिश्रा आणि श्री. नीलकंठ मोहंती यांनी गुरुपौर्णिमेच्या सेवेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
0 Comments