उडुपी (कर्नाटक) येथे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा
उडुपी (कर्नाटक) : गुरुकार्याची कक्षा व्यक्तीच्या आध्यात्मिक उद्धारापासून समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या उत्थानापर्यंत रुंदावलेली असतेे. वैयक्तिक उद्धारापेक्षा समष्टी उत्कर्षासाठी कार्य करणार्यांवर गुरुकृपा अधिक होते. धर्मसंस्थापनेचे, म्हणजेच हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य हे व्यक्ती, समाज, राष्ट्र अन् धर्म या सर्वांचा उत्कर्ष साधणारे आणि काळानुसार आवश्यक असे गुरुकार्य आहे. या कार्यात स्वक्षमतेप्रमाणे तन-मन-धनाने सहभागी होणे, हीच काळानुसार खरी गुरुदक्षिणा ठरणार आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. लक्ष्मी पै यांनी केले. येथील किदियूरू हॉटेलच्या सभागृहात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नीलावर गोशाळेचे विश्वस्त श्री. रघुपति तंत्रि यांनीही संबोधित केले. या कार्यक्रमाला २८२ हून अधिक जिज्ञासू उपस्थित होते.
वेदव्यास हे गुरुपरंपरेचे जनक ! – श्री. रघुपति तंत्रि, विश्वस्त, नीलावर गोशाळा
वेदव्यास हे गुरुपरंपरेचे जनक आहेत. ही व्यासपौर्णिमा बौद्ध, शीख, जैन पंथही साजरी करतात. आपल्या संस्कृतीचा द्वेष करून आक्रमकांच्या संस्कृतीचे उदात्तीकरण करणे, यालाच भारतात सेक्युलर म्हटले जाते.
क्षणचित्रे
१. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अलौकिक कार्य’ या विषयी लघुपट दाखवण्यात आला.
२. कार्यक्रमामध्ये आपत्काळात समाजसाहाय्यासाठी आवश्यक ‘प्रथमोपचार प्रात्यक्षिके’ आणि ‘स्वरक्षण प्रात्यक्षिके’ दाखवण्यात आली.
३. किदियूरू हॉटेलचे श्री. जितेश किदियूरू यांचा सत्कार करण्यात आला.