चेन्नई : कोलाथूर, चेन्नई येथील वीर सावरकर शाळेमध्ये १२ जुलै २०१९ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान घेण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रमा यांच्या पुढाकाराने शाळेतील शिक्षकांसाठी हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘साधनेचे महत्त्व आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ याविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना विषय आवडला. ‘प्रत्येक मासाला असा वर्ग शाळेत आयोजित करावा’, अशी विनंती मुख्याध्यापिका सौ. रमा यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना केली. शिक्षकांनी गुरुपौर्णिमा उत्सवासाठी अर्पण दिले, तसेच त्यांनी गुरुपौर्णिमा विशेषांकही घेतले.
चेन्नई येथील वीर सावरकर शाळेतील शिक्षकांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साधनेविषयी मार्गदर्शन
Tags : Hindu Janajagruti Samiti