Menu Close

दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे प्रशासनाला निवेदन

देहली येथील श्री दुर्गादेवीच्या मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून तोडफोड केल्याचे प्रकरण

डावीकडून सर्वश्री दीपक दुबे, सुभाषचंद्र त्यागी, सत्यप्रकाश शर्मा आणि अरविंद गुप्ता

चावडी बाजार (देहली) : चांदनी चौकातील चावडी बाजारातील हौजकाजी येथील श्री दुर्गादेवीच्या मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मंदिरातील श्री महाकाली, भगवान शिव आणि गणपति या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली, तसेच मंदिराला आग लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने येथील शहर दंडाधिकारी कार्यालयातील श्री. सत्यप्रकाश शर्मा यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे नोएडा समन्वयक श्री. अरविंद गुप्ता, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. दीपक दुबे, श्री. सुभाषचंद्र त्यागी, श्री. मुकेश कुमार सिंह आदी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *