आगरा (उत्तरप्रदेश) : शिवसेनेने येथील ताजमहालामध्ये पूजा आणि आरती करण्याचे आवाहन केल्यानंतर पुरातत्व विभागाने ताजमहालच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली. यानंतर प्रशासनाने येथील सुरक्षेत वाढ केली.
येथील शिवसेनेचे पदाधिकारी वीनू लवानिया यांनी सांगितले की, ताजमहाल हे वास्तविक ‘तेजोमहालय’ असून ते हिंदूंच्या श्रद्धास्थानाचे प्रतीक आहे. श्रावण मासातील चारही सोमवारी तेजोमहालयामध्ये आरती करण्यात येईल. आरती करण्यापासून आम्हाला रोखून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
गेल्या वर्षी काही महिलांनी ताजमहालामध्ये जाऊन पूजा केली होती. वर्ष २००८ मध्ये शिवसैनिकांनी ताजमहालमध्ये जाऊन अनुष्ठान केले हेते. त्या वेळी पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात