मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) : नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीदिनी म्हणजे १७ जुलै या दिवशी भर पावसात हिंदु जनजागृती समितीकडून बाजीप्रभु यांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रमेश पडवळ, जितेंद्र पंडित, विक्रांत मोरबाळे, हिंदु जनजागृती समितीचे वैद्य संजय गांधी आणि श्री. प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. या वेळी पावनखिंडीचा इतिहास सांगणार्या शेडची दुर्दशा पाहून धर्मप्रेमींनी खंत व्यक्त केली.
या वेळी वैद्य संजय गांधी म्हणाले, ‘‘केवळ २५० मावळ्यांच्या साथीने नरवीर बाजीप्रभु देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड लढवली. हा भाग आता धारातीर्थ बनला आहे. अशा स्वामीनिष्ठ मावळ्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेली अनेक वर्षे सातत्याने अभिवादन करण्यात येत आहे.’’