Menu Close

पुणे येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

हिंदु साधू-संतांवर टीका करणारे चित्रपट निर्माते अन्य धर्माच्या धर्मगुरूंवर टीका करण्याचे धाडस दाखवतील का ? – अभिजीत बोराटे, अध्यक्ष, हिंदवी स्वराज्य युवा संघ

आंदोलनात सहभागी धर्माभिमानी

पुणे : ‘लाल कप्तान’ या आगामी चित्रपटात नागा साधूंचा अवमान करण्यात आला आहे. हा चित्रपट आम्ही आमच्या भागातील कोणत्याही चित्रपटगृहात चालू देणार नाही. इतर धर्मांचे धर्मगुरु चांगले; पण हिंदू साधू हे लंपट आणि स्वार्थी अशी प्रतिमा उभी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. सगळ्या ‘खाना’वळीला हाताशी धरून असे चित्रपट काढले जात आहेत. इतर धर्मियांच्या धर्मगुरूंवर असा चित्रपट काढण्याचे धाडस दाखवतील का ?, असा प्रश्‍न हिंदवी स्वराज्य युवा संघाचे श्री. अभिजित बोराटे यांनी केला. हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने डेक्कन येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. ‘९९ टक्के गोरक्षक निःशस्त्र असतात, तर याउलट ९९ टक्के कसाई शस्त्रधारी असतात. त्यामुळे गोरक्षण करणे कठीण झाले आहे. पोलीसही काही कारवाई करत नाहीत’, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनाला १५० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते.

स्वाक्षरी करतांना हिंदुत्वनिष्ठ

क्षणचित्रे

  • आंदोलनाच्या वेळी स्वाक्षर्‍यांच्या मोहिमेत हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
  • रस्त्यावरून येणारे-जाणारे थोडा वेळ थांबून आंदोलनात सहभागी होत होते. विषय समजून घेत होते.
  • साध्या वेशातील पोलिसांनी ध्वनीचित्रीकरण केले. (अन्य धर्मियांच्या आंदोलनाचे पोलिसांनी अशा प्रकारे चित्रीकरण केले असते का ? – संपादक)

गोरक्षकांवरील खोटे खटले मागे घ्या, त्यांना संरक्षण द्या ! – अधिवक्ता नीलेश निढाळकर

गोमातेला पूज्य मानणार्‍या आपल्या देशात सर्रास गोहत्या होत आहेत. त्यांचे रक्षण करण्यासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या गोरक्षकांवर मात्र खोटे आणि गंभीर गुन्हे नोंदवले जात आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले जात नाही. हे सर्व थांबले पाहिजे. कायद्यानेच गोहत्या बंदी केली जावी आणि अवैध पशूवधगृहे बंद करावीत.

नागा साधूंची अनुमती घेतल्यावरच ‘लाल कप्तान’ चित्रपट प्रदर्शित करावा ! – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा

आपले सरकार इतर धर्मियांनी आक्षेप घेतल्यास केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण बोर्डाला आक्षेपार्ह भाग वगळण्यास भाग पाडते. ‘विश्‍वरूपम’ या चित्रपटात मुसलमानविरोधी दृश्ये असल्याने त्याला तमिळनाडूत बंदी घातली, तर ‘दा विंची कोड’ यात ख्रिस्ती धर्मावर टीका असल्याने गोव्यात त्याला बंदी घातली; पण आतापर्यंत केदारनाथ, पद्मावत या चित्रपटांच्या विरोधात आंदोलने करूनही हे चित्रपट प्रदर्शित झाले. खरे तर नागा साधू हे आद्य शंकराचार्यांचे सैन्य आहे. नागा साधू होण्यासाठी खडतर साधना करावी लागते. अशा साधूंनी वैयक्तिक स्वार्थासाठी ब्रिटिश अधिकार्‍याचा खून केल्याचे दाखवणे हा घोर अपमान आहे. यासाठी या चित्रपटावर बंदी आणा. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी सर्व उपस्थितांकडून मागण्यांचा ठराव संमत करून घेतला.

या वेळी द्वारकाधीश गोशाळेचे विश्‍वस्त श्री. मुकुंद मासाळ, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंचचे संपर्कप्रमुख श्री. दयानंद बंडगर, हिंदू एकता आंदोलन पुणे या संघटनेचे श्री. शैलेंद्र दीक्षित, गार्गी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. विजय गावडे, हरे कृष्ण गोरक्षा संघटनेचे श्री. प्रकाश केष्टवाल आणि श्री. संतोष क्षीरसागर, हरे कृष्ण गोरक्षा संघटनेच्या खराडी शाखेचे श्री. गोपालदासजी, शबरीमलाचे श्री. अशोक पिल्ले, अधिवक्ता सत्येंद्र मुळे, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे महादेव पवार, रसिकाताई वरूडकर विचारमंचचे श्री. सनी नायर, अधिवक्ता संभाजी यादव, गोरक्षक हनुमंत जाधव हे मान्यवर उपस्थित होते.

आंदोलनात सरकारकडे करण्यात आलेल्या मागण्या

  • गोरक्षक श्री. चेतन शर्मा यांच्यावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कडक कारवाई करावी.
  • ‘लाल कप्तान’ या नागा साधूंंवरील विडंबनात्मक चित्रपटावर शासनाने बंदी आणावी.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *