बांगलादेशमधील असुरक्षित हिंदू आणि हिंदूंची धार्मिक स्थळे !
ढाका : चंदपूर जिल्ह्यातील दासपारा येथे श्री दुर्गा आणि श्री काली मंदिर यांवर १३० ते १५० सशस्त्र धर्मांधांनी नुकतेच आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये फरिदुल इस्लाम दिदर, अतिकुर रहमान मसुद, मसुदुर रहमान राजी, हनुनूर रशीद, इद्रिश दिदर आणि हरुण दली यांचा समावेश आहे. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांच्या नेतृत्वाखाली मानवाधिकार पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हिंदूंच्या मंदिरांवर शस्त्रास्त्रांसह होणार्या आक्रमणाविषयी त्यांनी खेद व्यक्त केला आहे.
बोगुरा जिल्ह्यात श्री राधा गोविंद मंदिरातील मूर्तींची तोडफोड
बोगुरा जिल्ह्यातील अदमदिघी पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये असलेल्या श्री राधा गोविंद मंदिरावर ५ धर्मांधांनी १८ जुलै २०१९ या दिवशी आक्रमण केले. धर्मांधांनी मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली.या घटनेनंतर मंदिर समितीचे श्री. सुकुमल मास्तर यांनी पोलिसांत तक्रार केल्यावर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हिंदु शिक्षिकेची हत्या
चंदपूर जिल्ह्यात सौ. जयंती चक्रवर्ती (वय ४५ वर्षे) या हिंदु शिक्षिकेची २१ जुलैला गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. शोलागड जल विकास मंडळच्या वसाहतीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. अलोककुमार गोस्वामी यांच्या त्या पत्नी होत्या.
‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांच्या नेतृत्वाखाली मानवाधिकार पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या हत्येच्या प्रकरणाचे अन्वेषण करणार्या पोलीस अधिकार्यांशी पू. (अधिवक्ता) घोष यांनी चर्चा केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात