मुझफ्फरपूर (बिहार) : येथील जवाहरलाल मार्गावरील भारत सेवाश्रम संघाच्या सभागृहामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी उपस्थितांना संबोधित केले.
या वेळी श्री. कैलास वरोलिया आणि सौ. उर्मिला वरोलिया यांनी गुरुपूजन केले, तर सनातनचे श्री. ब्रीजमोहन मिश्रा यांनी पौरोहित्य केले. कु. सोनल चौधरी आणि कु. दीक्षा तोला यांनी आरती म्हटली. सनातनच्या साधिका सौ. मनीषा मिश्रा यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अलौकिक गुणांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शिवांगी श्रीवास्तव आणि सौ. भारती चौधरी यांनी केले.
क्षणचित्रे
१. सनातनच्या साधिका सौ. नीलम जालान या कर्करोगाने पीडित असूनही त्यांनी कार्यक्रमाला येण्याची सिद्धता केली, तसेच त्यांनी २५ साधकांच्या भोजनाचीही व्यवस्था केली.
२. मुझफ्फरपूर येथील धर्मप्रेमी श्री. कामेश्वर शर्मा यांचे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असतांनाही ते या कार्यक्रमासाठी पूर्णवेळ उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर त्यांनी त्यांच्या गावामध्ये अशाच प्रकारच्या एका कार्यक्रमाची मागणी केली आणि यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.