Menu Close

(म्हणे) ‘१५ मिनिटांसाठी पोलीस हटवून पहा !’ – अकबरुद्दीन ओवैसी यांचा पुन्हा फुत्कार

अकबरुद्दीन ओवैसी पुनःपुन्हा अशा धमक्या देण्याचे दुःसाहस करतात, यावरून त्यांना कायद्याचे भय राहिले नाही, हेच सिद्ध होते ! अशांना कायमचे कारागृहात डांबून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रयत्न का करत नाही ? याच प्रकरणात जामीनावर असणारे ओवैसी यांचा जामीन रहित करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाला सांगायला हवे !

अकबरुद्दीन ओवैसी

करीमनगर (तेलंगण) : मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एम्आयएम्चे) तेलंगण येथील आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी, ‘१५ मिनिटांसाठी पोलीस हटवून पहा…!’ या विधानाचा पुन्हा एकदा जाहीर सभेमध्ये पुनरुच्चार केला.

अकबरुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले की, देशातील मुसलमानांनी आता वाघ बनायला हवे. मुसलमान वाघ बनला, तर त्याच्यापुढे कोणीही चहावाला उभा राहू शकणार नाही. लोक आज जमावाकडून होणार्‍या हत्यांविषयी बोलतात. मी मुसलमानांना सांगतो की, तुम्ही त्रस्त होऊ नका. आम्ही जे काही येथे करू, त्याच्या बदल्यात स्वर्ग किंवा नरक मिळेल, असे मी तरुणांना सांगू इच्छितो. ‘शहीद’ हा नेहमीच स्वर्गात जातो. तरुणांनो, त्यांना कोणतीही घोषणा देऊ द्या, तुम्ही केवळ अल्लाहचे नाव घ्या. शहीद होण्याची भावना असेल, तर झुंडीने आक्रमण करणारे किंवा रा.स्व. संघवाला आमचे काहीच वाकडे करू शकत नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *