धुळे : धार्मिक स्थळी होत असलेल्या देवतांच्या विटंबनेच्या विरोधात येथील श्रीराम उत्सव समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने महापौर श्री. चंद्रकांतबापू सोनार यांना निवेदन देण्यात आले. याला महापौर श्री. सोनार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.
महानगरपालिका क्षेत्रातील धार्मिक स्थळांवर काही लोक देवतांच्या मूर्ती आणि छायाचित्रे, निर्माल्याच्या वस्तू आदी आणून ठेवतात. यातून धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. ते होऊ नये म्हणून हे निवेदन देण्यात आले. काही हिंदूंनी देवतांच्या मूर्ती, तसेच प्रतिमा पंचमुखी मारुति मंदिरामागे आणून ठेवल्या होत्या. त्यांची नकळतपणे विटंबना होत होती. त्यामुळे या मूर्ती आणि छायाचित्रे यांचे विधिवत विसर्जन करण्याचे ठरले.
महापौर श्री. चंद्रकांतबापू सोनार यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट दिली आणि सांगितले की, या मूर्तींचे आज विसर्जन करू नका. उद्या महानगरपालिकेच्या वतीने हे कार्य करण्यात येईल. महानगरपालिकेच्या वतीने १२ मास एक गाडी यासाठी कार्यरत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. एवढेच नव्हे, तर त्या गाडीला संपूर्ण भगवा रंग देऊन तिचे तात्काळ लोकार्पण करण्याचे आश्वासनही दिले. (देवतांची विटंबना रोखण्यास तत्पर असलेल्या महापौरांचे अभिनंदन ! – संपादक)
निवेदनावर सर्वश्री मनोज घोडके, योगेश भोकरे, मनोज जैन, राजेंद्र मराठे, शिरीष पांझरेश्वर, आनंद शेलार, हेमंत लोणारी, राहुल विभांडीक, जितेंद्र मासुळे, मनोज पिसे, ईश्वर मोरे, नीलेश पाटील, स्वप्निल पगारे, कपिल शर्मा, संतोष पाटील, एकनाथ देवरे, सचिन पाटील, जयेश वावदे, अजित पवार, दर्शन अग्रवाल, प्रितेश अग्रवाल, राज सरग, बबलू शिनकर, संजय पाटील, समाधान चौधरी, नीलेश रुणवाल, गुलाब माळी, हरी मुंदडा, विवेक पाटील, विनोद सुमाणिक आदींच्या स्वाक्षरी आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात