कागदी लगद्यापासून गणेशमूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. अशा मूर्तींचे विसर्जन केल्यास कागदाच्या रसायनयुक्त शाईने पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे नैसर्गिक रंगांनी रंगवलेल्या आणि शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्तीचा आग्रह धरून भाविकांनी धर्मशास्त्राचे पालन केले पाहिजे !
नवी मुंबई : कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्ती बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी सरकारकडून वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी वृक्षारोपण, संवर्धन, प्लास्टिक बंदी यांसारखे अभियान राबवले जात आहे. त्यामुळेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीपेक्षा शाडूच्या मूर्तीची मागणी वाढली आहे. आता वर्तमानपत्राच्या कागदांचा लगदा तयार करून मूर्ती तयार केली जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात