अशा बातम्या भारतीय प्रसारमाध्यमे नेहमीच दडपतात, तर हिंदूंच्या संतांवरील खोट्या आरोपांना वारेमाप प्रसिद्धी देतात !
व्हॅटिकन (रोम) : व्हॅटिकन चर्चने अमेरिकेतील पश्चिम व्हर्जिनियाचे बिशप मायकल ब्रॅन्सफिल्ड यांना बिशपपदावरून हटवल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या विरोधात लैंगिक शोषण आणि आर्थिक अपहार केल्याचा आरोप आहे. पोप फ्रान्सिस यांनी व्हीलिंग चार्लस्टनच्या डायोसेज संस्थेला पाठवलेल्या पत्रात बिशप मायकल ब्रॅन्सफिल्ड यांच्या चर्चसेवेवर बंदी घालण्यात आल्याचे म्हटले आहे.
बिशप मार्यकल ब्रॅन्सफिल्ड यांनी त्यांचे गुन्हे झाकण्यासाठी वरिष्ठ कॅथलिक अधिकार्यांना रोख भेटवस्तू देऊन स्वतःच्या प्रभावाखाली ठेवले होते. ख्रिस्ती धर्मोपदेशक बनण्यासाठी रोमन कॅथलिक महाविद्यालयात नव्याने भरती होेणार्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या पीडित मुलींना बक्षीस म्हणून त्यांनी ३ लाख ५० सहस्र डॉलर (२ कोटी ४१ लाख ५२ सहस्र रुपये) दिल्याचे त्यांच्यावर आरोप आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात