भाग्यनगर येथील गुरुपौर्णिमा महोत्सव
भाग्यनगर : भारत आणि भारतीय संस्कृती नष्ट झाली, तर एक आदर्श संपून जाईल. जो देश विश्वगुरु म्हणून प्रसिद्ध होता, तो आज पाश्चात्त्य विकृतीचा गुलाम झाला आहे. धर्मसंस्थापनेसाठी ईश्वर केवळ भारतभूमीत पुन:पुन्हा अवतार घेतो. अशा सनातन धर्माच्या रक्षणासाठी आपण सर्वजण तन, मन आणि धन अर्पण करून सहभागी होण्याचा संकल्प करूया आणि गुरूंचा आशीर्वाद घेऊया, असे मार्गदर्शन भारतीय संस्थेच्या संस्थापक सौ. सत्यवाणी यांनी येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने २१ जुलै या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या या गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचा सहभाग’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
- भाग्यनगर येथील श्रृंगेरी पीठाचे ८९ वर्षे वयाचे धर्माधिकारी या महोत्सवात उपस्थित होते.
- सौ. सत्यवाणी यांनी त्यांच्या सभागृहात प्रत्येक मासाला असा कार्यक्रम घेण्यास सांगितले, तसेच या सभागृहात लावण्यासाठी धर्मशिक्षण फलकांच्या संचाची मागणी केली.
- भावसार क्षत्रिय समाजाचे सचिव श्री. लक्ष्मीनारायण जोजोडे यांनी या कार्यासाठी वस्तूच्या रूपात साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.