गायीविषयी अमेरिकेतील पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता भारतातील पोलीस दाखवतील का ?
कॅनेक्टिकट (अमेरिका) : कॅनेक्टिकट राज्यात एका भांडाराच्या जवळ भरवस्तीत गायीचा गळा कापून तिची हत्या करणार्या एका धर्मांधाला पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. या भयानक प्रकारामुळे ब्लूमफिल्ड येथील इस्लामी कायद्यानुसार गोमांसाची विक्री करणारे ‘साबा मीट स्टोअर’ हे आस्थापन बंद करण्यात आले आहे, असे वृत्त ‘एन्बीसी’ने प्रसिद्ध केले आहे.
१. ‘साबा मीट स्टोअर’ येथून एक गाय निसटली आणि रस्त्यावरून पळत सुटली. या आस्थापनाचा कर्मचारी बद्र मुसाईद आणि ठेकेदार अॅण्डी मॉरिसन यांनी तिचा पाठलाग केला. ही गाय एका भांडाराच्या जवळ पोचली असता मॉरिसन याने तिच्यावर धनुष्यातून बाण सोडला; मात्र त्याचा नेम चुकला. त्याच वेळी बद्र मुसाईद याने सुर्याने गायीचा गळा कापला. या वेळी पोलीस घटनास्थळी उपस्थित होते.
२. सार्वजनिक ठिकाणी गायीची हत्या करण्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तसेच आरोपीला चौकशीसाठी उपस्थित रहाण्याविषयी नोटीस पाठवली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात