आसाममध्ये भीषण पूरस्थिती
बोंगाईगांव (आसाम ) : आसाममध्ये मागील काही दिवसांमध्ये पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून ३३ पैकी ३० जिल्हे प्रभावित झाले आहेत. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीचे येथील कार्यकर्ते श्री. जयदीप पटवा यांनी समितीच्या वतीने आपत्कालीन साहाय्यता पथक घेऊन धुबरीमधील पूरग्रस्तांसाठी खाद्य आणि पाणी यांचे वितरण केले. याचा लाभ १५ सहस्र पूरग्रस्तांनी घेतला. या कार्यात कोक्राझार येथील ‘हिंदु संथाल संस्कृती सुरक्षा परिषदे’चे अध्यक्ष श्री. जेठा हसदा आणि कार्यकर्ते श्री. बाबूसाहेब टुडू, धुबरी येथील समितीच्या धर्मशिक्षणवर्गाला येणारे श्री. आशुतोष महतो आणि श्री. कारण सह या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी ‘मारवाडी महिला समिती’ आणि धर्मप्रेमी यांनी साहाय्य केले.
पूरग्रस्तांची झालेली दुःस्थिती
१. स्वत:चे आणि जनावरांचे जीव वाचवण्यासाठी उंच रस्ते असलेल्या ठिकाणी लोक रहात आहेत.
२. अनेक दिवसांपासून शहरातील दळणवळण व्यवस्था बंद आहे. त्यामुळे खाण्यापिण्याच्या वस्तू उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. वीज, पिण्याचे पाणी नाही, तसेच ३ दिवसांपासून लोकांनी अन्न-पाणी ग्रहण केले नव्हते.