Menu Close

मुसलमान भागातून कावड यात्रेकरू गेल्यास बरेली रेल्वेस्थानक बॉम्बने उडवू : इंडियन मुजाहिदीन

  • यावरून ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे पुनःपुन्हा सिद्ध होते !
  • ‘जय श्रीराम’ न म्हटल्यावरून धर्मांधांना मारहाण झाल्याच्या कथित घटनांवरून हिंदूंना असहिष्णु म्हणणारी
  • पुरो(अधो)गाम्यांची टोळी याविषयी तोंड का उघडत नाही ?

बरेली (उत्तरप्रदेश) : मुसलमान भागातून कावड यात्रेकरू गेल्यास बरेली रेल्वेस्थानक बॉम्बने उडवू, अशी धमकी ‘इंडियन मुजाहिदीन’ या जिहादी आतंकवादी संघटनेचा एरिया कमांडर मुन्ने खान उपाख्य मुल्ला याने बरेली रेल्वे स्थानकाचे अधीक्षक सत्यवीर सिंह यांना पाठवलेल्या एक पत्रात दिली.

हे पत्र मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत बरेली जिल्ह्यात कावड यात्रेकरू आणि धर्मांध यांच्यात हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. (हिंदूंच्या यात्रेच्या वेळी धर्मांध आक्रमण करतात, तर हिंदू अन्य पंथियांच्या कार्यक्रमांत त्यांना साहाय्य करून स्वत: सर्वधर्मसमभावी असल्याचे दाखवत स्वतःची पाठ थोपटून घेतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *