Menu Close

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये विष घालून नरसंहार करण्याचा होता कट

श्री मुंब्रेश्‍वर मंदिरातील प्रसादामध्ये विष घालण्याचा कट रचणार्‍या धर्मांधांचा आणखी एक कट उघड !

धर्मांधांकडून अशा प्रकारे कट रचले जात असतांना त्यांचा वेळीच सुगावा लावणार्‍या सक्षम अन्वेषण यंत्रणा हव्यात !

मुंबई : श्री मुंब्रेश्‍वर मंदिरातील प्रसादात विष घालून भाविकांना ठार मारण्याचा कट रचणार्‍या धर्मांधांचा मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्येही विष घालून नरसंहार करण्याचा कट होता, अशी माहिती पोलीस अन्वेषणात पुढे आली आहे. जानेवारी २०१९ मध्ये आतंकवादी कारवायांच्या आरोपाखाली मुंब्रा (जिल्हा ठाणे) आणि संभाजीनगर येथून अटक करण्यात आलेल्या १० धर्मांधांचा श्री मुंब्रेश्‍वर मंदिरातील प्रसादात विष घालून भाविकांना ठार मारण्याचा कट असल्याचे आरोपपत्र आतंकवादविरोधी पथकाने मागील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. त्यानंतर पोलीस अन्वेषणात धर्मांधांकडून नरसंहार करण्याचा हा आणखीन एक कट उघड झाला आहे. याविषयीचे वृत्त ‘झी न्यूज (हिंदी)’ या वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आले.

या वृत्तामध्ये म्हटले आहे की,

श्री मुंब्रेश्‍वर मंदिरातील प्रसादामध्ये विष घालण्याचे षड्यंत्र ‘आयएस्आय’चा समर्थक तल्हा पोट्रिक या धर्मांधाने केले होते. त्यासाठी लागणारे विष सिद्ध करण्यासाठी त्याला त्याविषयीच्या एका जाणकार व्यक्तीची आवश्यकता होती. त्यासाठी पोट्रिक याने ‘फार्मासिस्ट’ असलेल्या अबू किताल तथा जम्मान नवाब खुटेउपाड याच्याशी ओळख करून घेतली. प्रसादासह मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावांमध्ये विष कालवण्यासाठी त्यांनी काही तलावांची रेकीही केली होती. विष सिद्ध करण्यासाठी आणलेले साहित्य त्यांनी ३ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले होते. यांतील सलमान नावाचा धर्मांध विष सिद्ध करणार होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *