हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजन !
नाशिक : जिल्ह्यातील महादेवपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘स्वरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ या प्रवचनाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. धर्मावर होणारे आघात आणि लव्ह जिहादच्या माध्यमातून युवतींवर होणार्या आघातांविषयी हिंदु जनजागृती समितीच्या जिल्हा सामिती समन्वयक श्रीमती वैशाली कातकडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
हिंदु देवस्थानांमधील भ्रष्टाचार, गोरक्षकांवर होणारी आक्रमणे, धर्माच्या रक्षणासाठी कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांवर होणारे आघात यांसारख्या हिंदूंवर होणार्या विविध आघातांना सामोरे जाण्यासाठी ‘संघटनाची आवश्यकता आणि स्वरक्षणाची आवश्यकता’ या विषयांवरही यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गावाचे सरपंच श्री. विलास राजे सांडखोरे यांच्या पुढाकाराने हे प्रवचन घेण्यात आले. गावातील सर्वश्री दिलीप सांडखोरे, राजेश डांगे, योगेश भागवत यांनीही या आयोजनात योगदान दिले. या वेळी धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते
विशेष
१. प्रवचनाच्या नियोजनासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन नियोजन केले.
२. महिलांनी धर्मशिक्षणवर्गाचे नियोजन करण्यात पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.